Ad will apear here
Next
धामणसेच्या रत्नेश्वर देवस्थानातर्फे रायवळ आंब्यांच्या २२०० रोपांची लागवड


रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील स्वयंभू श्री रत्नेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने रायवळ आंब्यांच्या विविध प्रकारच्या २२०० रोपांची लागवड नुकतीच करण्यात आली. या उपक्रमामुळे रायवळ आंब्यांची विविधता जपण्यास मोठा हातभार लागणार आहे. धामणसे हे पर्यटन क्षेत्र आहे. तसेच स्वयंभू श्री रत्नेश्वर हे अनेकांचे कुलदैवत आहे. 



या उपक्रमांतर्गत एक हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट ट्रस्टने ठेवले होते; पण त्याहून जास्त म्हणजे एकूण २२०० रोपे लावण्यात आली. या उपक्रमात ग्रामस्थ, धाणमसे हायस्कूलचे विद्यार्थी असे ३५० जण सहभागी झाले. यात तरुणांचा सहभाग मोठा होता.



श्री रत्नेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सध्या चालू आहे. नव्या मंदिराचे संकल्पचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या चित्रामध्ये मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस हिरगावार डोंगर आहे. विविध ऋतूंमध्ये निसर्ग आपले रंग बदलत असतो. पावसाळ्याव्यतिरिक्तच्या काळातही नवीन मंदिरामागचा भाग हिरवागार दिसण्यासाठी वर्षभर हिरव्यागार राहणारी रायवळ आंब्याची रोपे लावण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला.

रायवळ आंब्यांमध्ये अनेक प्रकार असून, फळांचे आकार, चव, रंग यांनुसार त्यांना त्या त्या भागात वेगवेगळी नावे दिली जातात. रायवळ आंब्यांच्या स्थानिक प्रजाती हे कोकणातील जैवविविधतेचे मोठे वैभव आहे. रायवळ आंब्यांच्या झाडांवर रोग-किडींचे प्रमाण अगदी नगण्य असते. हे आंबे अत्यंत चविष्ट असतात; त्यात अनेक पौष्टिक घटक असतात; मात्र ते हापूससारखे कापून खाता येत नाहीत. तसेच त्यांची टिकवणक्षमताही हापूसच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे त्याकडे ग्राहक आकर्षित होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच त्यांचे मार्केटिंग फारसे केले जात नाही. हापूस आंब्यांना मोठी मागणी असल्याने त्यांची लागवड केली जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. रायवळ आंबे बहुगुणी असले, तरी त्यांची मुद्दाम लागवड करण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे देवस्थानाने राबविलेला हा उपक्रम रायवळ आंब्यांमधील विविधता जपण्यास बहुमोल मदत करणार आहे. 

एकसारखी चव आणि रंग हे हापूस आंब्यांचे वैशिष्ट्य, तर चव, आकार आणि रंग यातील विविधता हे रायवळ आंब्यांचे वैशिष्ट्य. कोकण म्हणजे हापूस आंब्यांची भूमी अशी ओळख आहे; मात्र कोकण हे रायवळ आंब्यांच्या शेकडो प्रजातींचेही घर आहे. आताच्या काळात रायवळ आंब्यांच्या झाडांचे प्रमाण कमी होत चालले आहे. कारण त्यांची व्यावसायिक लागवड केलीच जात नाही. या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे महत्त्व मोठे आहे.



‘श्री रत्नेश्वर मंदिराचे बांधकाम काळ्या दगडांचा वापर करून केले जात असून, हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल,’ असे रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शेखर देसाई यांनी सांगितले. तसेच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी देण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZYKCD
 Fantastic activity....Congrats. ...Thanks for sharing
 How many of these have taken roots ? How many have survived the
recent floods ? Does somebody bother to collect and keep the data ?
Similar Posts
‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील
‘श्रद्धा’पूर्वक मेहनतीतून ‘समर्थ’तेकडे... रत्नागिरी : महिला स्वयंसाह्यता बचत गटांची चळवळ आता राज्यभरात चांगलीच फोफावली आहे; मात्र उत्तम आणि सातत्यपूर्ण कामगिरी दीर्घ काळ करणाऱ्या बचत गटांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. अशा दुर्मीळ बचत गटांमध्ये रत्नागिरी शहराजवळच्या नाचणे गावातील श्रद्धा सबुरी गटाचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. या गटातील महिलांनी
इंटरनेटमुळे संस्कृत पत्रकारिता बहरतेय रत्नागिरी : ‘संस्कृत ही पुरातन भाषा सध्या लोकव्यवहारातून मागे पडली असली, तरी इंटरनेटमुळे संस्कृतचे पुनरुज्जीवन होण्यास मोठा हातभार लागतो आहे. ऑनलाइन पोर्टल्स, वेबसाइट, टीव्ही चॅनेल्स, ऑनलाइन रेडिओ अशा विविध माध्यमांतून संस्कृत पत्रकारिता बहरू लागली आहे. सध्या देशभरात ११०हून अधिक संस्कृत नियतकालिके सुरू

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language